'आता वेळ बदलली आहे, आणि...' लेकाच्या बर्थडे दिवशी भावुक झाला Suniel Shetty, अहानसाठी शेअर केलेली खास पोस्ट व्हायरल
Suniel Shetty post for Ahan shetty Birthday:बॉलिवूडचा 'अण्णा' अर्थात सुनील शेट्टीने आज आपला मुलगा अहान शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Suniel Shetty post for Ahan shetty Birthday:बॉलिवूडचा 'अण्णा' अर्थात सुनील शेट्टीने आज आपला मुलगा अहान शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
मुंबई: अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या मुलांबद्दल नेहमीच भरभरून बोलताना दिसतो. आज आज, २८ डिसेंबर रोजी त्याच्या लाडक्या लेकाचा म्हणजेच अभिनेता अहान शेट्टीचा वाढदिवस आहे. या खास निमित्तानं सुनीलनं इंस्टाग्रामवर अहानचा एक स्टायलिश फोटो शेअर करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
View this post on Instagram
काय आहे सुनील शेट्टीची पोस्ट?
सुनील शेट्टीनं आपल्या पोस्टमध्ये अहानचं कौतुक करताना म्हटलंय की, "तुला स्वतःच्या हिंमतीवर आणि सन्मानानं पुढं जाताना पाहून माझे हृदय अभिमानानं भरून येतंय. तू ज्या पद्धतीचा व्यक्ती म्हणून घडला आहेस आणि तुझ्यासमोर जे काही भविष्य आहे, त्याचा मला अभिमान आहे."
सुनीलनं पुढं लिहिलं की, आता वेळ बदलली आहे... आणि आता तुझी वेळ आली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या लेका... सुनीलच्या या वाक्यातून अहानच्या आगामी मोठ्या प्रोजेक्ट्सबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
बहीण अथिया आणि केएल राहुल यांच्याही शुभेच्छा
केवळ सुनीलच नाही, तर अहानची बहीण अभिनेत्री अथिया शेट्टीनंही आपल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं काही बालपणीचे आणि लग्नातील जुने फोटो शेअर करत लिहिलं की, "ज्या व्यक्तीवर मी सर्वात जास्त प्रेम करते आणि जिला सर्वात जास्त सहन करते, अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!"
तसंच भारतीय क्रिकेटर केएल राहुलनंही अहानसोबतचा फोटो शेअर करत त्याला 'भाऊ' म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.